तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीचे अनुसरून करण्यातून आज आपल्या समोर निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करत जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा...
- महाराष्ट्रातील मजुरांसाठी उद्धव ठाकरेंनी करावं नितीशकुमार यांचं अनुकरण
- अन् तिने उद्धव ठाकरेंना लाईव्हमध्ये विचारलं, आदित्य सिंगल आहे का?
- उद्धव ठाकरेंवर टीकेप्रकरणी कंगणाच्या बहिणीला नेटकऱ्यांनी झोडपले..
उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, “तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा आणि समतेचा मार्ग दाखविला. प्राणिमात्रांसह मानवी जीवनाच्या उत्थानासाठी तथागत बुद्धांनी ध्यान मार्ग आणि तपश्चर्या केली. त्यांच्या संबोधी– ज्ञानाची आज जगाला नितांत गरज आहे.”