उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज, वाचा काय म्हणाल्या 'त्या' चार उमेदवारांना?
विधान परिषद निवडणूकीत (MLC Election) भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलंलं आहे. पंकजा यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनाही डावलण्यात आलं आहे. या चार वरिष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने विधान परिषदेत संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र तसं घडलं नाही.
हे ही वाचा...
- MLC Election: पंकजा मुंडेंचा पत्ता कट, कशी होणार नाराजी दूर?
- फडणवीसांना पंकजा मुंडेकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा टोला
- पंकजा मुंडे म्हणतात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीत ‘हे’ आहे अंतर
यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रीय़ा काय असेल याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद असल्याचं म्हटलं आहे.
पंकजा यांनी म्हटलं आहे की, “आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस… साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद”
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 8, 2020
वंचित बहुजन आघाडीला रामराम करुन विधानसभेच्या निव़डणूकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढलेले गोपिचंद पडळकर यांना भाजपने संधी दिली आहे. त्याचबरोबर अपेक्षेप्रमाणे माढा मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार निवडून आणि माळशिरस मध्ये पक्षाचा आमदार निवडून आणणाऱ्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आहे.
इतर दोन उमेदवारांमध्ये नागपूर चे माजी महापौर प्रविण दटके यांचा समावेश आहे. तर नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांना भाजपने विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणूकीतील दारुण पराभवानंतर पंकजा यांनी भाजप कोअर कमिटीतीतील पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर भाजपमधील शीतयुद्ध सातत्याने समोर येत राहिलं. यादरम्यान मुंडे आणि खडसे यांची जवळीकही वाढली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ आणि नाराज नेत्यांची आता पुन्हा राजकीय फरफट होत असल्याचं म्हटलं जात आहे.