महाराष्ट्रातील मजुरांसाठी उद्धव ठाकरेंनी करावं नितीशकुमार यांचं अनुकरण

Update: 2020-05-04 13:02 GMT

लॉकडाऊनमध्ये दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या मजुरांच्या परतीचा रेल्वे खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी जाहीर केलंय. तिकिटाशिवाय या मजुरांना वरखर्चासाठी १००० रुपये देण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलंय.

हे ही वाचा...

बिहार सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मजुरांच्या परतीच्या रेल्वे खर्चासहीत ५०० रुपयांची मदत सरकारने करावी अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

देशभरात अडकलेले मजूर आपल्या घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रेल्वे प्रशासनाने यासाठी विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, मजूरांना रेल्वे प्रवासाचा खर्च स्वत: करावा लागतोय. यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी गरजू मजूरांच्या परतीच्या प्रवासाचा खर्च कॉंग्रेस करणार असल्याची मोठी घोषणा केली.

‘राज्याबाहेरून येणाऱ्या मजूर आणि विद्यार्थ्यांकडून तिकिटासाठी एकही रुपया घेणार नाही तसंच त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था करण्यात येईल’ अशी घोषणा बिहार सरकारने केली आहे.