‘ये कौन चित्रकार है..’, मेधा कुलकर्णी यांनी केलं मुलीच्या पेंटींग्जचं कौतुक  

Update: 2020-05-23 09:33 GMT

लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या बहुतेकांनी वेळ घालवण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. सुरवातीला लॉकडाऊनचा हा काळ रोजच्या धावपळीतून मिळालेली क्षणभर विश्रांती आणि कुटुंबासाठी मिळालेला वेळ वाटत होता. मात्र, आता लोकांना घरात बसून राहणं अशक्य झालं आहे. मग यावर उत्तम पर्याय म्हणून बरेच जण आपले जुने छंद जोपासत आहेत.

हे ही वाचा..

भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांची मुलगी कल्याणी कुलकर्णी-सरदेसाई हिनेही लॉकडाऊनमधील वेळेचा फारच सुंदर उपयोग केलाय. तीने काढलेल्या सुंदर चित्रांचे फोटो मेधा कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसं पाहीलं तर त्यांची मुलगी ही आर्कीटेक्ट असून सध्या कामातून मिळालेल्या वेळेत तीने आपला जुना पेंटींग करण्याचा छंद जोपासला आहे.

 

[gallery columns="1" data-size="large" bgs_gallery_type="slider" ids="13654,13657,13661,13659,13658"]

मेधा कुलकर्णी यांनी गायक मुकेश यांच्या गाण्याचे बोल लिहून आपल्या मुलीच्या पेंटींग्जचं कौतुक केलं आहे. सोबतच त्यांनी तिच्या लहानपणी शाळेत काढलेल्या चित्राचा किस्साही शेअर केलाय.

एखादा Sr. K.G मधे असताना तिने तिच्या शाळेच्या ड्रॉइंग बुक मधे एक मिश्किल कासव आणि गुबगुबीत अळी काढली होती.. ती चित्रे इतकी मस्त आली होती की तिच्या ड्रॉइंग टीचर ला वाटले तिला आम्ही कोणी काढून दिली.. त्यांनी तिला ती चित्रे फळ्यावर सर्वांसमोर काढायला सांगितली. तिनेही धिटाईने तिच्या चिमुकल्या हातांनी चित्रे काढली. आणि ती बघून शिक्षिकेचे समाधान झाले.. ही तिला तिच्या चित्रांना मिळालेली पहिली पावती.. मला आणि तिला हे आजही आठवते..

कल्याणी तुझी आत्ताची चित्रेही खूप छान आहेत.. त्या कासव आणि अळी सारखी...

[gallery columns="1" data-size="full" bgs_gallery_type="slider" ids="13652,13655,13651,13653,13657,13656"]

 

Full View