#AatmanirbharBharat: नरेंद्र मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कोरोना व्हायरस च्या विरोधात लढण्यासाठी 20 लाख कोटी रुपयाचे पॅकेज घोषीत केले आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपी च्या 10 टक्के असेल असा दावा मोदी यांनी केला आहे.
कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आतापर्यंत रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेलं पॅकेज आणि आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेलं पॅकेज एकत्रित करुन 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज होईल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.
या पॅकेजच्या माध्यामातून लॅंड, लेबर, लॉ, लिक्विडीटी वर लक्ष दिलं आहे. पुढील काही दिवसात पॅकेज संदर्भात अर्थमंत्री या आर्थिक पॅकेजची माहिती देशाला देतील.
जेव्हा जगभरात कोरोना आपत्तीची सुरुवात झाली तेव्हा भारतात PPE kit आणि N95 मास्कची निर्मिती केली जात नव्हती. आणि आज अशी परिस्थिती आहे की, साधारण २ लाख PPE किट आणि २ लाख N95 मास्कची निर्मिती आपण देशात रोज करत आहोत.
या पॅकेजमध्ये शेती क्षेत्राला असे आमूलाग्र पद्धतींनं बदलून टाकू ज्यामुळे भविष्यात कोरोनासारख्या संकटाचा शेती क्षेत्रावर कुठला परिणाम होणार नाही. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.