आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आज संपेल. याचा अर्थ असा की तुमच्याकडे कोणत्याही दंडाशिवाय ITR फाइल करण्यासाठी आज मध्यरात्री 12 पर्यंत वेळ आहे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 30 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत 6 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे २६.७६ लाख आयटीआर फक्त ३० जुलैलाच दाखल झाले. तुम्ही ही मुदत चुकवल्यास, तुम्हाला नंतर रिटर्न भरण्यासाठी दंड भरावा लागेल. जर वैयक्तिक करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील.