गेल्या ६५ दिवसांपासून दिल्लीत मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा जनआक्रोश उसळला आहे. या संघर्षात शेतकरी आणि मोदी सरकार मध्ये कृषी कायदा रद्द केला जावा याबद्दल अनेक चर्चेच्या फैरी झाल्या. या सर्व चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांना राग आनावर झाला आणि देशाच्या प्रजास्ताक दिनीच २६ जानेवारीला दिल्लीच्या अनेक भागात हिंसाचार उसळला या हिंसाचारानंतर राष्ट्रवादीच्या खासदार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टिका केली आहे.
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत गेल्या आहेत. दिल्लीत अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. "मी या केंद्र सरकारचा निषेध करत आहे. ज्या रितिने शेतकरी आणि पोलिसांचे जे काही नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनात जो काही हिंसाचार झालेला आहे.
#FarmersProtests : सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर घणाघात... त्यावर मी जाहिर निषेध करते. आणि मी केंद्राच्या गृहमंत्र्याना विनंती करते की, हे जे काही आंदोलन झालं, ते शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्यात आणलं हे कोणी केलं आणि यामागे कोण आहे याचा पारदर्शकपणे शोध घेण्यात यावा. गेले ६० दिवस आंदोलन सुरू आहे आणि त्यात हिंसा होते हे देशाला शोभेल असं नाही आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, आणि तो आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहे त्यात त्यांच्यावर हिंसा होते, लाठीचार्ज केला जातो, गोळ्या झाडल्या जातात. हे किती योग्य आहे?" अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.