(trupti desai) देशभरात Lockdown 3.0 च्या कालावधीमध्ये १७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये केंद्र शासनाने राज्य सरकारांना आपल्या राज्यातील परिस्थिती अनुरुप निर्णय घेत व्यवसाय आणि उद्योग सुरु करण्य़ाची परवानगी दिली. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोननुसार लॉकडाऊन शिथिल करण्याचे आदेश देण्यात आले.
देशभरातील मद्यप्रेमींच्या आणि राज्य सरकारांच्या महसूलाच्या दृष्टीने महत्वाची असलेली दारूची विक्री सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दारूची दुकानं उघडणार म्हणून मद्यप्रेमिंनी दारूच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या. सोशल डिस्टसिंगचा नियम धाब्यावर बसवला आहे.
हे ही वाचा...
- उद्धव ठाकरे आपल्या घरातले बीग बॉस- तृप्ती देसाई
- लॉकडाउन मध्ये तृप्ती देसाईंना दारु खरेदी करताना अटक?
‘दारुच्या विक्रीतून मिळणारा महसूल म्हणजे महिलांचा शाप आहे आणि पण महिलांचे शाप असणारा पैसा महसूल म्हणून स्वीकारू नका अन्यथा सरकारला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही’ असं मत तृप्ती देसाई (trupti desai) यांनी यापुर्वीही व्यक्त केलं होतं. “दारुमुळे महिलांवरील हिंसाचाराच्या घटना वाढतील.
कोपर्डी आणि हैद्राबादमधील मधील दुर्देवी घटना या दारुच्या नशेतच झाल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घेतलेला हा निर्णय महिलांसाठी घातक आहे. तसेच आता दारु पिण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे उरले नाही ते घरात उरलं सुरलं विरुन दारु पितीलं.” असं भीती त्यांनी व्यक्त केली.