शिंदे गट मनसेत विलीन होणार? राज ठाकरे काय म्हणाले..

आज झी २४ तास या वृत्तवाहिनीचे संपादक निलेश खरे यांना राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखती दरम्यान प्रस्ताव आला तर या 40 आमदारांना स्वीकाराल? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे. शेवटी हे माझ्याबरोबर जुने काम केलेले लोक आहेत पूर्वीचे. हा झाला सगळा टेक्निकल भाग. तुम्ही बोलताय तशा बातम्या मीही ऐकल्या आहेत. टेक्निकल मला काही फार माहिती नाही. समजा त्यांच्याकडून अशा प्रकारची काही गोष्ट आली तर नक्की विचार करेन. असं म्हटलं आहे.;

Update: 2022-07-23 15:35 GMT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झी चोविस तासचे संपादक निलेश खरे यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही असं वक्तव्य केलं.

झी २४ तास चे मुख्य संपादक निलेश खरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जर तर मध्ये नकोच जाऊयात भाजपशी युती होईल नाही होईल हा भविष्यातला प्रश्न, साधारण 2014 आणि 2017 च्या टप्प्यात तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा किंवा तुम्ही त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता? असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं विश्वास ठेवण्यासारखं नाहीय काही. बाकीच्या लोकांचं मला वाईट वाटतं परंतु हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही असं म्हणत उध्दव ठाकरेंवर हल्ला केला.

याशिवाय राज ठाकरे यांनी या मुलाखतीत बोलताना चाळीस आमदारांच्या मनसेत विलिनीकरणाबाबतही त्यांनी त्यांचं मत मांडलं. निलेश खरे यांच्या अशी एक चर्चा होती सध्याच्या परिस्थितीमध्ये मनसेमध्ये हे जे 40 आमदार आहेत ते विलीन करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून कायदेशीर पातळीवर हे आमदार गट म्हणून स्थापित होतील. ते पक्षात विलीन होतील. प्रस्ताव आला तर या 40 आमदारांना स्वीकाराल? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे. शेवटी हे माझ्याबरोबर जुने काम केलेले लोक आहेत पूर्वीचे. हा झाला सगळा टेक्निकल भाग. तुम्ही बोलताय तशा बातम्या मीही ऐकल्या आहेत. टेक्निकल मला काही फार माहिती नाही. समजा त्यांच्याकडून अशा प्रकारची काही गोष्ट आली तर नक्की विचार करेन. असं म्हटलं आहे.

त्यावर निलेश खरे यांच्य़ा असं नाही वाटत की यामुळे तुमचा कार्यकर्ता जो आहे त्याला दुजाभाव दिला जाईल? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी अजिबात नाही. माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक आहे बाकीचे नंतर असं म्हणत पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील दिलासा दिला.

Tags:    

Similar News