राज ठाकरेंच्या व्यासपीठावर महिलांना स्थान नाही?
राज ठाकरे यांची काल ठाण्यात सभा झाली. या सभेत मंचावर एकही महिला पदाधिकारी नव्हत्या. मनसेत महिला पदाधिकाऱ्यांना मंचावर स्थान नाही का?;
मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackrey) यांनी गुढीपाडव्यादिवशी शिवतिर्थावर जाहिर सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जाहिरपणे टिका केली. या सभेनंतर राज ठाकरेंवर अनेकांनी टिका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी काल राज ठाकरे यांची ठाण्यात सभा झाली. या सभेत त्यांनी ज्या कोणी त्यांच्यावर टीका केली होती त्यांना उत्तर देखील दिलं. हे सर्व झालं. पण या दरम्यान एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती ती म्हणजे त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सभेला मोठ्या संख्येने महिला आल्या मात्र राज ठरेंच्या मंचावर एकही महिला पाहायला मिळाली नाही.
ज्या मंचावरून राज ठाकरे यांनी भाषण केले त्या मंचावर महिलांचा दुष्काळ पाहायला मिळाला. आता या मंचावर 10-15 लोकं होते. मनसेचे अनेक पदाधिकारी मंचावर बसले होते. पण या मंचावर बसलेल्या लोकांमध्ये एकही महिला पदाधिकारी नव्हत्या. खरतर मनसेची महिला आघाडी अत्यंत सक्षम आहे. त्यांच्या पक्षात अनेक महिला नेत्या आहेत. मग असं असताना महिला पदाधिकाऱ्यांना मंचावर स्थान का दिलं जातं नाही?
काल राज ठाकरे सभेसाठी ठाण्यात पोहोचले. त्यानंतर ते मंचावर आले. राज ठाकरे मंचावर आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी ठाणे शहराच्या वतीने शहर अध्यक्षांसोबत उपाध्यक्षांना देखील निवेदकाने मंचावर बोलवले. ठाणे शहर उपाध्यक्षा महिला आहेत. त्या मंचावर आल्यानंतर या सभेत महिलांकडे दुर्लक्ष झालं नसल्याचं वाटलं. त्या मंचावर आल्या पण फक्त फोटो काढण्यापुरत्याच..
आता या सगळ्यात हीच गोष्ट महत्वाची आहे की, राजकीय पक्ष महिलांना अशा प्रमुख कार्यक्रमात स्थान का देत नाहीत? आता ही गोष्ट फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एकाच पक्षात आहे असा भाग नाही. कुठलाच पक्ष महिलांनाचा नेहमी नावापुरताच वापर करतो. त्यांना पद दिले जाते मात्र अशा महत्वाच्या कार्यक्रमात एकतर त्या नसतात आणि असल्या तरी त्या कुठेतरी मागच्या रांगेत असतात.
आम्ही #MaxWoman च्या माध्यमातून या गोष्टीवर नेहमी आवाज उठवत आलो आहोत. महिलांना नावापुरती पदे नको तर त्यांना संपूर्ण निर्णय प्रकियेत, महत्वाच्या ठिकाणी देखील सहभाग हवा..