पदाचा दुरुपयोग करतात म्हणून रुपाली चाकणकर यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल..
भाजप नेते नारायण राणे व गणेश नाईकांविरोधात पदाचा गैरवापर करत आदेश दिल्याचा दावा इंडियन बार असोसिएशनने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या पदाचा दुरूपयोग राजकीय लढाईत करत असल्याचा आरोप करत भाजप नेते नारायण राणे व गणेश नाईकांविरोधात पदाचा गैरवापर करत आदेश दिल्याचा दावा इंडियन बार असोसिएशनने केला आहे. चाकणकरांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.
रुपाली चाकणकर यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएशन तर्फे मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भाजप नेते नारायण राणे आणि गणेश नाईक यांच्या विरोधात आदेश केल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते नारायण राणे यांचे दिशा सालीयन प्रकरण चांगलेच तापले होते. त्यानंतर राणे यांच्या विरोधात अलीकडेच काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणांमध्ये राजकीय हेतूने चाकणकर कारवाई करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप एका महिलेने केला होता. 1993 पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. आणि त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. असे गंभीर आरोप संबंधित महिलेने केले होते. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाने आपल्या ट्विटर हांडेल वरून दिली होती. तर हा सगळ्या अशा प्रकरणात रुपाली चाकणकर यांची भूमिका राजकीय असल्याचे बार असोसिएशनचे म्हंटले आहे.
नारायण राणे आणि दिशा सालीयन प्रकरण
दिशा सालीयन यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या झाली व ती गरोदर होती. असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर दिशा सालीयन यांच्या कुटुंबियांनीच राणेंनी केलेल्या दाव्यावर आक्षेप घेतला होता. तसेच त्यांनी आमच्या मुलीची बदनामी थांबवावी असे आवाहन केले होते. या प्रकरणी कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानंतर नारायण राणे व त्यांच्या मुलावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.