सिंधूदूर्गच्या अक्षयने साकारले पक्ष्यांच्या पिसावर साकारले छत्रपती
सोमवारी तिथीनुसार शिवजयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिंधूदुर्गच्या अक्षय मेस्त्री याने पक्ष्यांच्य़ा पंखावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकरली आहे.;
१९ फेब्रुवारी प्रमाणेच तिथीप्रमाणेदेखील राज्यभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होते. प्रत्येकजण जसं जमेल तसा शिवजयंती साजरी करत असतो. शिवजयंती निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील गव्हाणे गावचा युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती औचित्य साधून पक्षाच्या पिसावर चित्र रेखाटले आहे. ऐक्रलिक कलरच्या माध्यमातुन हे चित्र रेखाटले असून महाराजांना चित्रातून मानवंदना दिल्या आहेत.