"गोष्ट एका पैठणीची "चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली . यामध्ये "गोष्ट एका पैठणीची"या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला आहे .

Update: 2022-07-22 12:55 GMT

 ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराशी घोषणा झाली आहे. यामध्ये मराठीतील "गोष्ट एका पैठणीची" या मराठी चित्रपटाला 68 वा चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून आणि किशोर कदम यांना विशेष ज्यूरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महिलांमध्ये लोकप्रिय असणारा साडीचा प्रकार म्हणजे पैठणी. अशीच पैठणी घेण्याची एका पत्नीची इच्छा "गोष्ट एका पैठणीची"या मराठी चित्रपटातून दाखवली आहे .याच चित्रपटाला आता सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाल्याने या चित्रपटातील अभिनेत्री सायली संजीव यांनी आनंद व्यक्त केला आहे त्याचबरोबर या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती आणि मेहनीतचं चीज झाल्याचही ती म्हणाली आहे .

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित झाला असून त्याचबरोबर गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी विशेष ज्यूरीचा पुरस्कार किशोर कदम यांना जाहीर झाला . "मी वसंतराव"या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे.त्याचबरोबर कुंकुमार्चन या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक पुरस्कारासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो .सुवर्ण कमळ ,रौप्य कमळ अशी या पुरस्कारांची नावे आहेत.

Tags:    

Similar News