किरण खेर यांच्या प्रकृतीविषयी अफवा; अनुपम खेर यांचं ट्विट म्हणाले

सोशल मीडियावर अभिनेत्री किरण खेर यांच्या निधनाच्या चर्चा पाहायला मिळत होती.;

Update: 2021-05-08 06:20 GMT

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्ग्जांच्या निधनाच्या अफवा पसरवल्या जात आहे. शुक्रवारी अनेक सोशल साइटवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री किरण खेर यांच्या निधनाच्या चर्चा पाहायला मिळत होती. मात्र ही फक्त अफवा असल्याचं माहिती अनुपम खेर यांनी ट्विटरवरून दिली.

अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, किरणच्या प्रकृतीविषयी अफवा पसरत आहे. ते सर्व चुकीचं आहे. तिची प्रकृती ठीक आहे आणि आज दुपारीच तिने कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. मी लोकांना विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या नकारात्मक बातम्या पसरवू नये', असा ट्विट खेर यांनी केला आहे.

तसेच अनुपम खेर आणि किरण खेर यांनी लशीचा दुसरा डोस घेतला. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
Tags:    

Similar News