courtesy social media
गरोदर महिलांनाही कोरोना लस देण्यात यावी की नाही यावरून गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम होता. मात्र आता इतरांप्रमाणे गरोदर महिलांनाही लस घेता येणार असून, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
लसीकरण गरोदर महिलांसाठी उपयोगाचं असून त्यांनाही लस देण्यात यावी,असं आयसीएमआरचे डेप्युटी जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटलंय. त्यामुळे देशातल्या गरोदर महिलांनाही लस घेण्यास आता परवानगी मिळाली आहे.