केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कोरोनाचाही सुरू होता उपचार
थावरचंद गहलोत हे केंद्रात सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री आहेत.;
मुंबई: कोरोनाचा कहर देशाच्या प्रत्येक भागात पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कन्या योगिता सोलंकी यांचं कोरोनाच उपचार सुरू असताना सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
थावरचंद गेहलोत यांची मुलगी सोलंकी 43 वर्षांची होती, काही दिवसांपूर्वी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे योगितावर गेल्या पंधरा दिवसांपासून इंदूरच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु सोमवारी तिचा मृत्यू झाला. थावरचंद गहलोत हे केंद्रात सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री आहेत.
कोरोनामुळे देशातील परिस्थिती भयंकर होत चालली आहे.कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा वाढताना पाहायला मिळत आहे. तर डिसेंबरपूर्वी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.