हिजाब प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या अभिनेत्याला अटक..

Update: 2022-02-23 03:37 GMT

हिजाब वादावरील सुनावणी मंगळवारी अनिर्णित राहिली, परंतु कर्नाटक उच्च न्यायालयाने या आठवड्यात यावर तोडगा काढू इच्छित असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून हिजाबवरील बंदी किंवा सूट यावर नववी सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सरन्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आले आहे.

दुसरीकडे, कर्नाटक पोलिसांच्या सल्ल्याला न जुमानता हिजाबच्या सुनावणीबाबत चिथावणीखोर ट्विट करणाऱ्या अभिनेता चेतन कुमारला अटक करण्यात आली आहे.

हिजाब बंदी प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपैकी एक न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्याबद्दल ट्विट केल्याबद्दल बंगळुरू पोलिसांनी अभिनेता चेतन कुमारला ताब्यात घेतले आहे. मध्य विभागाचे पोलीस उपायुक्त एमएन अनुचेथ यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, शेषाद्रिपुरम पोलीस ठाण्यात सुओमोटो अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

चेतनने शेअर केलेल्या ट्विट मध्ये म्हंटल होत की,'' कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा यांनी बलात्काराचा आरोपी राकेशला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ज्यामध्ये भारतीय महिलांनी बलात्कारानंतर झोपणे अशोभनीय असल्याचा दावा केला होता; याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं'' असं ट्विट करत त्याने बलात्कार प्रकरणात दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर आक्षेप घेतला होता.

त्यानंतर आता न्यायाधिशांवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या या कन्नड अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News