जन्म. ५ जानेवारी १९८६ डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे. बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले.त्यानंतर दीपिकाने बी.ए करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. खरं तर वयाच्या ८ व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. कॉलेजच्या दिवसांमध्येच तिने रॅम्प वॉक केला होता.लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्का अशा ब्रँड्सची ती अॅम्बेसेडर होती. दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली.
हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅयक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला. 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता.
परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले होते. राम-लीला' या चित्रपटातून रणवीर-दीपिका पहिल्यांदा ऑनस्क्रीन झळकले होते. त्यानंतर दोघांचं अफेअर असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. 'बाजीराव-मस्तानी'या चित्रपटानंतर जणू त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. काही दिवसांपूर्वी फिल्मफेअरच्या पार्टीत दीपिकाने रणवीरचा 'बॉयफ्रेण्ड' असा उल्लेख केला होता. इतकेच नाही तर रणवीर दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबतही अनेकदा दिसला आहे. 'पद्मावती'या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपटात हे दोघे दिसले होते. या चित्रपटात रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने लग्न करण्याआधी एकमेकांना सहा वर्ष डेट केलं. दोघांच्या नात्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लोकप्रियता, काम आणि कमाईच्या बाबतीत दीपिका रणवीरपेक्षा फार पुढे होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये या दोघांनी लग्न केले. आत्ता १० जानेवारी २०२०ला दीपिका पदुकोणचा बहुचर्चित छपाक हा चित्रपट येत आहे. यात या सिनेमात दीपिका पदुकोण मालती नावाच्या एका अशा मुलीची भूमिका साकारत आहे जिच्यावर अॅसिड हल्ला होतो. मात्र ती तिच्या आयुष्यातील लढाई जिंकते आणि शौर्यानं या परिस्थितींचा सामना करते.
-संजीव वेलणकर