सध्या मध्य रेल्वे प्रशासनात मराठी भाषेची कमतरता मोठ्या प्रमाणात भासू लागल्याचे चित्र पाहायला मिळतेय. कारण कधी रेल्वेच्या जिन्यांवर चुकीचे भाषांतर तर आता अर्धवट लेडी डॉक्टर्सच्या भरतीची जाहिरात... वारंवार मध्य रेल्वे प्रशासनाच्या मराठी भाषेसंदर्भात होणाऱ्या चुका लक्षात घेता मध्य रेल्वेकडून मराठी भाषेचा अपमान केला जातोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
पुणे विभागासाठी मध्य रेल्वेनं एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीत दिलेला मजकूर कंत्राट पद्धतीवर अर्धवट लेडी डॉक्टर्सची दोन पदे भरण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह उपस्थित रहावे. मात्र अर्धवट लेडी डॉक्टर्सची भरती अशी जाहिरात छापल्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला की नेमकं मध्य रेल्वेला काय म्हणायचं आहे.
नेमकं या जाहीरातीचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी मॅक्सवुमन टीमने मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला.
(या ट्वीटचा फोटो रेल्वे पीआरओने आम्हाला पाठवली आहे)
त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही चूक टायपिंग मिस्टेकमुळे झाली असून ती दुरुस्त करुन दुसऱ्यादिवशी पुन्हा पुढारी कोल्हापूर एडिशनमध्ये छापण्यात आली.
तसेच त्यांनी जाहिरातीसाठी मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या मजकूराच्या अर्जाची प्रतही मॅक्सवुमनला दिली आहे.
तसेचं पुढारी ऑनलाईनच्या जाहिरात विभागाचे व्यवस्थापक रुपा जोशी यांच्याशी या जाहिरातीसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आम्हाला टायपिंग मिस्टेक असून मध्यरेल्वेची पुढारी ऑनलाईनने माफी मागितली असं देखील सांगितलं. तो माफीनाफा मेल रुपा जोशी यांनी मॅक्सवुमनला पाठवला आहे
एकंदरित मध्य रेल्वेने या जाहिरातीवरुन आपलं स्पष्टीकरण दिलं असलं तरी मराठी भाषेसंदर्भात होणाऱ्या वारंवार चुका लक्षात घेता असं समोरं येत की, कदाचित मध्य रेल्वे प्रशासनाला मराठी भाषा अवगत नाही तसेच जनसंपर्क अधिकारी हे अमराठी असल्यामुळे अशा पद्धतीची चुकांना मध्य रेल्वेला वारंवार सामोरं जावं लागतंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.