राजकीय काऊ ताई चिऊ ताईची गोष्ट

Update: 2023-07-08 11:21 GMT


 सध्याचं राजकीय वातावरण पाहता अनेकजण स्वतःची मते व्यक्त करत आहेत.लहानपणी ऐकलेल्या "चिऊ ताई चिऊ ताई दार उघड" या ओळी आणि त्यातील संवाद आपण आवडीने ऐकला आहे . याच आशयाची कविता वैशाली सोनवलकर यांनी लिहली आहे .

काऊ ताई चिऊ ताई

ची गोष्ट

............................................

रैय्यतेच मन होतं शेणाच

राजकारणीच मन होतं मेणाचं

जनतेने साद घातली नोकरी

नाही

राजकारणी म्हणाले थांब मी

माझ्या पक्षाला मजबूत करतो

जनतेने साद घातली शिक्षण

नाही

राजकारणी म्हणाले थांब मी

पुढच्या निवडणुकीसाठी गुंतलो

जनतेने साद घातली पिण्याचे

पाणी नाही

राजकारणी म्हणाले थांब मी

दुसऱ्या पक्षावर आरोप करतो

जनतेच मन होतं शेणाचं

भावनेच्या ओघात क्षणांत

विरघळे होय

राजकारणीच मन होत मेणाच

सत्ता मिळाली की क्षणात

बठ्ठर होय!

वैशाली सोनवलकर

Tags:    

Similar News