ग्रामसभांना स्थगिती, गावचा कारभार ठप्प

Update: 2020-08-02 10:15 GMT

कोरोनाच्या संकटामुळे सरकारने १२ मे रोजी राज्यातील ग्रामसंभांवर बंदी घातली आहे. आपल्याकडे ग्रामसभांना, महिला सभांना नुकतीच नियमित सुरूवात झाली होती. यामधून गावाच्या विकासाची कामं, गावातील मूलभूत सोयी सुविधा, आरोग्यविषयक कामांबाबत निर्णय होतात. पण आता ग्रामसभा बंद असल्याने ही सर्व कामे ठप्प आहेत. याचा फटका गावकऱ्यांना बसतोय. पण ग्रामसभा बंद न करता सामाजिक अंतराचे नियम पाळून घेता येऊ शकतात, अशी भूमिका आता अनेक सरपंच मांडू लागले आहेत. यासंदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील माणकापूरच्या सरपंच वर्षा निकम यांच्याशी संवाद साधलाय पत्रकार साधन तिपन्नाकजे यांनी...

https://youtu.be/Hv6Z1zCpGjk

Similar News