'Love u my Lil Lady In Red'' सुहानाचा पहिला प्रोजेक्ट आणि SRK चे ट्विट..
Suhana Khan मेबेलाइनची बनली ब्रँड अॅम्बेसेडर...;
शाहरुख खान आणि गौरी खान (shahrukh khan and gauri khan) यांची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्क स्थित ब्युटी ब्रँड मेबेलाइनची (Maybelline) नवीन ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सुहानाने भाग घेतला होता. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सुहाना लाल रंगाच्या सूटमध्ये दिसत होती. व्हिडिओमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच ती या ब्रँडचा नवीन चेहरा बनली आहे..
कार्यक्रमात सुहाना काय म्हणाली..?
कार्यक्रमात सुहानाने मीडियाशी संवाद साधला. ती म्हणाली, 'मी इथे येऊन तुम्हाला पुन्हा भेटायला खूप उत्सुक आहे. शूटिंग करताना खूप मजा आली. त्यामुळे इथे आल्यानंतर आम्ही काय शूट केले ते दाखवण्यासाठी मी थांबू शकत नाही. मेबेलाइनचा ब्रँड अॅम्बेसेडर होणे हा सन्मान आहे.
शाहरुख खानने ट्विट करत केले कौतुक..
सुहानाच्या या पहिल्याच प्रोजेक्ट बद्दल वडील शाहरुख खान यांना अत्यंत आनंद झाला आहे त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, चांगले कपडे घातलीस, चांगलं बोललीस, तू एकदम चांगलं केलीस आणि यात मी माझं क्रेडिट घ्यायचं असेल तर तू well brought up! Love u my Lil Lady In Red!! असं ट्विट शाहरुख खानने केले आहे..
Congratulations on Maybelline beta. Well dressed…well spoken…well done & if I may take some credit well brought up! Love u my Lil Lady In Red!! pic.twitter.com/tLnAQlXoTj
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 12, 2023
या चित्रपटात दिसणार सुहाना खान?
सुहाना (Suhana Khan) सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. ती लवकरच दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत खुशी कपूर, अगस्त्य नंदा कपूर आणि वेदांग रैना हे देखील दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.