लोकहो शिखा कडून काहितरी शिका
शिखा मलहोत्रा ही अभिनेत्रीसोबतच एक सर्टीफाइड नर्सही होती. कोरोना काळात तिने मुंबईच्या ट्रोमा सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची सेवा केली होती. गेली सहा महिने रूग्णांची सेवा केल्यानंतर काल अचानक शिखाला लकव्याचा झटका आला आहे.;
अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिला जुहू येथील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्ट्रोकमुळे तिच्या शरीराच्या उजव्या बाजूवर मोठा परिणाम झाला आहे. कोविड-19 संसर्गातून बरी झाल्यानंतर महिन्याभरातच अभिनेत्रीला स्ट्रोक चा त्रास झाला. त्यामुळे तिच्या उजव्या बाजूवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. तिला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शिखा मल्होत्रा ही अभिनेत्रीसोबतच एक सर्टीफाइड नर्सही असल्याने कर्तव्य प्रथम म्हणत तिने कोरोना काळात मुंबईच्या ट्रोमा सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची सेवा केली होती. रूग्णांची सेवा करताना ऑक्टोबर महिन्यात शिखा स्वत:ही कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. योग्य उपचार घेऊन शिखाला २२ ऑक्टोबरला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. कोरोनातून बाहेर येऊन काही दिवस होत नाही तर शिखाला लकव्याचा झटका आला. लकव्याचा झटका आल्यानंतर शिखाला त्वरित मुंबईच्या कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रूग्णालयातील उपचार महागडे असल्याने शिखाला विले पार्लेच्या कूपर रूग्णालयात शिफ्ट करण्यात आले.
शिखाच्या सोशल मीडियावरून ही माहिती तिच्या चाहत्यांना देण्यात आली. शिखाच्या या बातमीमुळे तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तिच्या निरोगी जिवनासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहे.