बॉलिवुडची वादग्रस्त अभिनेत्री आणि मॉडेल पुनम पांडे (Poonam Pandey) हिला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) अटक केली होती. लॉकडाऊनच्या (Lockdown In Mumbai) काळात नियमांचं उल्लघन केल्य़ाप्रकरणी पोलिसांना तिच्यावर ही कारवाई केली होती. मात्र, पूनम पांडेने लॉकडाऊन उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्य़ावेळी आपल्या घरी ती मॅरेथ़ॉन चित्रपट पाहात होती आणि ती अगदी ठीक आहे असा दावा तिने केला आहे.
हे ही वाचा...
- वादग्रस्त अभिनेत्री पुनम पांडेला अटक, मित्रासह केला ‘हा’ पराक्रम
- कोरोनाच्या लढाईत परिचारिका याच देवदूत ; अजित पवार
- उद्धव ठाकरे नोकरदार आणि रश्मी ठाकरे व्यवसायिक, पाहा कोणाची संपत्ती जास्त
आपल्या आलिशान गाडीतून मरिनड्राइव्हमध्ये सॅम अहमद बॉम्बे या मित्रासह फिरत असताना पोलिसांनी त्यांना अडविले होते. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दोघांनाही रात्री 8च्या सुमारास अटक (Poonam Pandey Arrest) करण्यात आली. ही कार जप्त करण्यात आली आहे.
पुनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो (Hot Photo), व्हिडीओ (Hot Video) आणि वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नशा (Nasha) चित्रपटातून बोल्ड भूमिकेमुळे ती अधिक चर्चेत आली होती. इन्स्टग्रामच्या माध्यामातून ती नेहमीच बोल्ड व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
आपल्याला अटक झालेली नसल्याचे तिने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.तिने एक क्लिप शेअर करून काल रात्री आपण घरी सिनेमा पाहात होते असे म्हटलंय. सलग ३ सिनेमा पाहिल्याचे ती सांगते. परंतु अटक झाल्याची अफवा पसरली असून ती खोटी आहे. रिपोर्ट नुसार पूनम आणि तिच्या मित्रावर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी कलम १८८ आणि २६९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.