नवाजुद्दीन सिद्दीकीला पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस, पाहा कोण आहे त्याची पत्नी?

Update: 2020-05-19 05:29 GMT

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आपल्या अनेक चित्रपटांमधील जिवंत अभिनयासाठी ओळखला जातो. तसेच त्याच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातील स्ट्रगलचे किस्सेही त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलेच आवडीचे आहेत. मात्र, सध्या नवाजच्या आयुष्यातील एक अचंबित करणारी गोष्ट समोर आली आहे. त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.

हे ही वाचा...

नवाजुद्दीन ची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) हिने नोटीस बजावली असून घटस्फोट आणि पोटगीची मागणी केली आहे. तीचे वकील सहाय यांनी या नोटीसमध्ये अभिनेता आणि त्य़ाच्या कुटुंबावर गंभीर आरोप लावले असल्याचं म्हटलं आहे.

Courtesy : Social Media

नवाजुद्दीन आणि आलियाचं लग्न २००९ साली झालं होतं आणि त्यांना दोन मुलं देखील आहेत. हा नवाजुद्दीनचा दुसरं लग्न असून पहिलं लग्न शिबा हिच्याशी झालं होतं.

Courtesy : Social Media

दरम्यान, नवाजुद्दीन त्याच्या कुटुंबासह मुंबईमधून आपल्या गावी उत्तरप्रदेशात गेला आहे. मुजफ्फरपुर आणि महाराष्ट्र पोलिसांकडून आवश्यक अनुमती आणि नियमांचं पालन करुन त्याने आपल्या मुळ ठिकाणी प्रवास केला. सध्या तो संपुर्ण कुटुंबासह होम क्वारंटाईन आहे.