‘मी घराबाहेर गेली की कोणीतरी मैत्रीण घरात यायची’, नवाजुद्दीनच्या पत्नीचे गंभीर आरोप
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याला पत्नी आलिया सिद्दीकी ने (Aaliya Siddiqui) घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचं काही दिवसांपुर्वीच समोर आलं. ११ वर्षांच्या संसारानंतर तिने नवाजपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीस पाठवताना तिने नवाजुद्दीन च्या कुटुंबांवर गंभीर आरोपही केले होते. आता पुन्हा आलिया ने गंभीर आरोप करत नवाजुद्दीन याचे दुसऱ्या महिलेशीही संबंध असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा...
- नवाजुद्दीन सिद्दीकीला पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस, पाहा कोण आहे त्याची पत्नी?
- #नथीचानखरा: सोशल मीडियावर का होतोय हा ट्रेंड व्हायरल?
- ‘ये कौन चित्रकार है..’, मेधा कुलकर्णी यांनी केलं मुलीच्या पेंटींग्जचं कौतुक
‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबांवर बरेच गंभीर आरोप केले. आलियाने म्हटलं की, "लग्नानंतर सुरुवातीच्या काही वर्षातच मी नवाजला सोडून वेगळं राहिली होते. माझ्या ६ महिन्याच्या मुलाला घेऊन मी वर्षभर भाड्याच्या घरात राहिले होते. आंतरजातीय विवाह केल्यामुळे माझ्यासोबत घरच्यांनीही सर्व संबंध संपवले होते. त्यावेळी ८ महिन्यापर्यंत नवाज मुलालाही भेटायला आला नव्हता. पण जेव्हा पुन्हा आमचं बोलणं सुरु झालं तेव्हा मी त्यांना पुन्हा एक संधी द्यावी असा विचार केला. परंतू काहीच बदललं नाही. मला त्रास देणं अजूनच वाढलं. मी त्याच्या अफेयर्स बद्दलही ऐकलं होतं. जेव्हा कधी मी घरातून बाहेर जायची कोणीतरी मैत्रीण घरी आलेली असायची.“