देशात कोरोना व्हायरसची सुरुवात झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे गायिका कनिका कपूर. कोरोनाची लागण झाल्यानंतरही तीने राजकीय नेत्यांचा सहभाग असलेल्या पार्ट्यांना हजेरी लावल्याची बातमी आल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला होता. त्य़ानंतर तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आणि सध्या ती कोरोनावर मात करुन घरी परतली आहे.
हे ही वाचा...
- Fact Check: जगातील पहिली कोरोना लस चाचणी केलेल्या महिलेचा मृत्यू?
- Good News: 'त्या' ३ वर्षांच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात
- CoronaVirus : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ८ हजार पार, ११८८ रुग्णांवर यशस्वी इलाज
दरम्यान, या काळात कणिका कपुर (Kanika Kapoor) चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांपेक्षा सर्वाधिक चर्चेत आणि गुगलवर सर्च करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर राहिली. घरी परतल्यानंतर कनिकाने नेमकं हे सर्व का आणि कसं झालं याची सर्व हकीकत आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितली आहे. “मी चुकले म्हणून मी गप्प नव्हते तर लोकांना गैरसमज झालाय हे जाणून मी गप्प बसले होते. योग्य वेळी सत्य बाहेर येण्याची मी वाट पाहत होते.” अशी खंत तीने व्यक्त केली आहे.
कनिकाने लिहलंय की,
माझ्या कथेची वेगवेगळी रुपं एव्हाना तुम्ही सगळ्यांनी ऐकली असतील. मी आतापर्यंत मौन बाळगलं म्हणून काहींनी त्यात तेल ओतण्याचंही काम केलं. मी चुकले म्हणून मी गप्प नव्हते तर लोकांना गैरसमज झालाय हे जाणून मी गप्प बसले होते. योग्य वेळी सत्य बाहेर येण्याची मी वाट पाहत होते. मी माझ्या कुटुंबीयांचे, मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे आभार मानते. तुम्हीसुद्धा सुरक्षित असाल अशी मी आशा व प्रार्थना करते.
तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मी सध्या आईवडिलांसोबत लखनऊ इथल्या घरी आहे. युके असो, मुंबई असो किंवा मग लखनऊ असतो, माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीता रिपोर्ट कोविड १९ निगेटीव्ह आला आहे. मी १० मार्च रोजी युकेहून मुंबईला आले आणि विमानतळावर माझी रितसर तपासणी झाली. त्यादिवशी मला क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार असं अजिबात सांगण्यात आलं नव्हतं. (युकेने १८ मार्चपासून नियमावली जारी केली.) मला कसलीच लक्षणं जाणवली नव्हती म्हणून मी स्वत:ला क्वारंटाइन केलं नव्हतं. माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी ११ मार्च रोजी लखनऊला गेले. त्यावेळी देशांतर्गत विमानतळावरही स्क्रीनिंग नव्हती. १४ आणि १५ मार्च रोजी मी मित्रांसोबत लंच व डिनरला गेले होते. मी कोणतीच पार्टी आयोजित केली नव्हती आणि माझी तब्येतसुद्धा चांगली होती. १७ व १८ मार्च रोजी माझ्यात लक्षणं दिसू लागली तेव्हा करोनाची चाचणी करण्यात आली. १९ मार्च रोजी चाचणी झाली आणि २० मार्च रोजी मी करोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी मी रुग्णालयात दाखल झाले. तीन निगेटीव्ह रिपोर्ट्स आल्यानंतर मला डिस्चार्ज देण्यात आला आणि आता २१ दिवस मी घरीच राहणार आहे. माझ्या डॉक्टर्स व नर्सेसचे मी विशेष आभार मानते. प्रत्येकजण संवेदनशील व प्रामाणिकपणे याकडे पाहिल अशी मी आशा करते.
एखाद्या व्यक्तीवर टीका केल्याने सत्य बदलत नाही.