मराठी सीनेसृष्टीची सुप्रसिद्ध तारका सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने नुकताच आपल्या आयुष्यातील काही सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सोनालीने नुकताच आपला साखरपुडा उरकला असून याची घोषणा तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून केली आहे. मात्र २ फेब्रुवारीला हा साखरपुडा उरकला होता. म्हणजे लॉकडाऊन संपेपर्यंत ती कदाचित विवाह बंधनात अडकण्याचाही निर्णय घेतील.
सोनाली सोबत ज्या व्यक्तीच्या रेशीमगाठी जुळल्या आहेत त्याचं नाव आहे कुणाल बेनोडेकर.
कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.
कुणालचं शिक्षण लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झालं.
त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.
लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप सोनालीने काही अधिकृत माहिती दिली नाही. त्यांच्या भावी आयुष्य़ासाठी खुप खुप शुभेच्छा..