कोरोना योद्धांसाठी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं तुम्ही पाहिलत का?

Update: 2020-05-03 04:26 GMT

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आज देश मोठी लढाई लढत आहे. या लढाईत डॉक्टर, पोलिस, नर्स, स्वच्छता कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी कोरोना विरोधात लढणाऱ्या या योद्ध्यांचे गाण्याच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

हे ही वाचा...

‘तू मंदिर, तू शिवाला’ असं गाणं कोविड योद्ध्यांसाठी अमृता फडणवीस यांनी स्वरबद्ध केलं आहे. टी –सिरीजच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या या गाण्याला आशिष मोरे यांनी स्वरबद्ध केलं आहे तर राजू सपकाळ यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत. पाहा व्हिडीओ..

https://youtu.be/OZZQUnDv_qg?list=RDOZZQUnDv_qg