सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचं निधन झालं. कुटुंबिय आणि काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, कपूर कुटुंबिय आणि मित्रपरिवार शोक सागरात बुडालेला असताना सोशल मीडियावर ट्रोलर्सनी अभिनेत्री आलिया भट (Aliya Bhat) हिला एका वेगळ्य़ाच कारणासाठी लक्ष्य केलं.
ऋषी कपुर यांच्य़ा पार्थिवाच्या अंत्यदर्शानासाठी लोक जमले असताना आलिया आपल्या फोनवर व्हिडीओ बनवत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडीयावर व्हायरल करण्यात आले. कोणताही विचार न करता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात न घेता ट्रोलर्सनी आलियावर टीकांचा वर्षाव केला.
प्रत्यक्षात आलिया ने ऋषी कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahni) हिच्यासाठी व्हिडीओ कॉल केला होता. ती दिल्लीला असल्यामुळे तिला वेळेत पोहचणं शक्य झालं नाही. रिद्धीमाला वडिलांना शेवटचं पाहता यावं म्हणून व्हिडीओ कॉलच्या माध्यातून आलियाने शेवटपर्यंत तो व्हिडीओ कॉल सुरु ठेवला होता.
दरम्यान, सोशल मीडियावरील या ट्रोलींगनंतर आलियाच्या चाहत्यांनी या घटनेचं सत्य सांगत तिला पाठींबा दिला. मात्र, कोणतीही घटना समजून न घेता व्यक्त होण्याचं प्रमाण सोशल मीडियावर फारचं वाढताना दिसत आहे.