Home > News > Ladli Award 2023 : मॅक्सवुमन 'लाडली' पुरस्काराने सन्मानित

Ladli Award 2023 : मॅक्सवुमन 'लाडली' पुरस्काराने सन्मानित

Max Woman honoured by Ladli Award 2023 for the coverage of woman empowerment, Special Series on Woman's who are suffered from family violence.

Ladli Award 2023 : मॅक्सवुमन लाडली पुरस्काराने सन्मानित
X

Jaipur : महिला विश्वातील सर्वांगीण विषयांवर परखड लेखण करणारं, महिला सशक्तीकरण, महिला अत्याचार, ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या मॅक्सवूमन या स्वतंत्र विचारसरणीच्या पहिल्याच पोर्टलला ‘लाडली मीडिया ॲन्ड ॲडव्हटाईजमेंट’ या पुरस्कारानं Ladli Media and Advertisements राजस्थानच्या जयपूर इथं विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं.



महिलांवरील अत्याचार आणि ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणासाठी मॅक्सवुमन ने विशेष मालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत लाडली मीडिया ॲन्ड ॲडव्हटाईजमेंट या पुरस्कारानं मॅक्सवुमनला गौरविण्यात आलंय.




वाढता कौटुंबिक हिंसाचार तसेच ग्रामीण भागातील महिलांचा अर्थकारणात सहभाग हे दोन महिलांशी निगडित प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. मात्र, अनेक महिला या परिस्थितीचा सामना कसा करतात ? त्यांचे प्रश्न त्या कशा पध्दतीने हाताळतात यावर आधारीत असलेली ही मालिका मीडियातील विशेष प्रयत्न म्हणुन पॅाप्युलेशन फर्स्ट यांच्या कौतुकास पात्र ठरली.

मॅक्सवुमन च्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली काही प्रयोग आखण्यात आले, त्या प्रयोगांचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले. अनेकदा या महिलां बातम्यात बंद होवुन जातात. मात्र मॅक्सवुमन च्या विशेष प्रयत्नातून या महिला केवळ बातमीच बनल्या नाहीत तर स्वतःची आप बिती कुठल्याही मध्यस्था शिवाय त्यांनी मॅक्सवुमन वर मांडली. शनिवारी जयपूर येथे पार पाडलेल्या नेत्रदीपक सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मॅक्सवुमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

काय आहे मॅक्सवुमन ?

Max woman उपेक्षित समुदायांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. महिला, मुली आणि इतर वंचित घटकांना आवाज देण्याचे काम करते. महिलांचे हक्क आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करून, MaxWoman या समुदायांसमोरील आव्हानांबद्दल जागरूकता वाढवण्याचा आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे.

ज्या समाजात अनेक स्त्रिया आणि मुली अजूनही त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आणि त्यांना समान नागरिक म्हणून वागणूक मिळण्यासाठी संघर्ष करत आहेत, तिथे MaxWoman सारखे मीडिया प्लॅटफॉर्म त्यांच्या हक्कांची जाणीव करण्यात आणि सामाजिक न्यायाचा प्रचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. चर्चा आणि विषय समजावून घेण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देऊन, हे व्यासपीठ अधिक न्याय देणारं आणि न्याय देणारा समाज निर्माण करण्यात मदत करू शकतात, जिथे सर्व आवाज एकत्र येत सर्वांना सन्मान आणि आदराने वागवलं जातं.





Updated : 23 Oct 2023 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top